खामगाव | प्रतिनिधी
आपल्या देशावर जागतिक कोरोनाचं संकट आलं आहे, त्या संकटाला आपण सामोरे जात – जात आताच वर्ष उलटलं आहे. कोरोना ला हद्दपार करण्यासाठी शासन स्तरावरून ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. सरकार प्रयत्न करतेय हरकत नाही आणि तुम्ही आम्ही सर्वच मिळून या कोरोना च्या आजाराला हद्दपार करूच त्यात काही शंका नाही, पण या गंभीर आजाराने अनेकांचे नाहक बळी घेतले, अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत त्याच कारणही तसंच आहे. घराचा करता पुरुषच कोरोना सारख्या आजाराने मृत्यू मुखी पडतो आणि जगाचा निरोप घेतो त्यामुळे त्या कुटुंबाची अवस्था यावर आज न बोललेले बरे. पण या निमित्य राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पुन्हा आठवण करून द्यावी लागत आहे कारण खामगाव मध्ये आपण आले असता तुम्हीच कोरोना ने कुठल्या पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबांना 50 लाखाची मदत करण्यात येईल असे बोलले होते. मग ही घोषणा हवेत का विरत आहे. आपल्या देशाचा चौथा आधार स्तंभ म्हणजेच लेखणीचे राजा सुध्दा आज कोरोना ने बळी जात आहेत. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली त्यावर आता तुम्ही दिलेल्या घोषणांची तुम्हाला आठवण करून देतो.

खामगाव येथील दै मातृभूमी ला कार्यरत असलेले पत्रकार विनोद पाठक हे कोरोना आजाराने मृत्युमुखी पडले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी व दोन लहान मुलांना आधार फक्त आपण जाहीर केलेली मदतच होऊ शकते. अश्या कठीण काळात तरी आपण कामी यावे, नाही तर जनता जनार्दन च्या भरवशावर आलेलं प्रत्येक सरकार आपली पोळी शेकत आहे असंच म्हणावं लागेल. असे सत्याग्रह शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय संयोजक कैलास फाटे यांनी म्हटले व त्या आशयाचे निवेदन प्रत्यक्षात ना राजेश टोपे यांना भेटून देऊ असे फाटे यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले.

