आरोग्य कंत्राटी कर्मचाऱयांचे विविध मागण्यांसाठी ११ पासून बेमुदत कामबंद आंदोलन

0

जळगाव;- कंत्राटी कर्मचाऱयांना ११ महिन्यांनी पुनर्नियुक्ती द्यावी , ९ फेब्रुवारी २०१८ चे परिपत्रक रद्द करणे , कायमस्वरूपी समकक्ष रिक्त पदांवर समायोजन करणे , नवीन होणारी भरती रद्द करणे , समायोजनपर्यंत समान काम समान वेतन धोरण राबविणे आदी विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन ११ पासून पुकारण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली .

यावेळी भूषण पाटील,संजय भावसार,किशोर पाटील,निलेश पाटील,परवीन जगताप, हरिशचंद्र पवार , योगेश जावरे , रवी व्यास , जितेंद्र पाटील डॉ . प्रशांत जायभाये , शरद बडगुजर, विपीन परदेशी आदी उपस्थित होते .

यावेळी बोलताना विजय षीने यांनी सांगितले कि , नुकतीच २ एप्रिलला झालेल्या कॉन्फरन्समध्ये अतिरिक्त संचालकांनी सर्व कंत्राटी कर्मचाऱयांना यापुढे ६ महिन्यांची पुनर्नियुक्ती देण्याच्या सूचना देऊन एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर्स तयार करण्यात आले असून त्यानुसार मानांकन तयार केली आहेत याला कंत्राटी कर्मचाऱयांच्या विरोध असून नवीन होणारी भरती रद्द करणे , समायोजनपर्यंत समान काम समान वेतन धोरण राबविणे आदी विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन ११ पासून पुकारण्यात येत आहे असे श्री . शिंदे यांनी सांगितले .

Leave A Reply

Your email address will not be published.