मागण्या मान्य न झाल्यास 24 रोजी रिक्षा बंद चा इशारा
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यासह शहरातील रिक्षा चालक व मालकांना सतत आर टी ओ विभाग व आरटीओ एजंट कडून त्रास होत असतो या त्रासाला कंटाळून रिक्षा चालकांनी विविध मागण्यां केल्या आहेत याकरिता येथील राष्ट्रीय रिक्षा चालक व मालक संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष तथा पीआरपीचे नेते जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 22 जून रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर लोटांगण घालून आंदोलन करण्यात आले .रिक्षा चालक व मालक यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 24 जून रोजी रिक्षा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
शहरात नुकतेच 21 रोजी डॉ प्रदीप नाईक हॉस्पिटल जवळील धम्मनगर एका रिक्षा स्टाफचे उद्घाटन महामंत्री जगन सोनवणे यांच्या हस्ते झाले यावेळी सोनवणे यांनी शहर व तालुक्यातील रिक्षा चालक व मालक यांचा आर टीओ विभाग व आरटीओ एजंट कडून त्रास वाढला असून नाहक 10 ते 20 हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे तसेच कलाम 207 अ नुसार जाचक अटी लादण्यात येत आहे त्या रद्द व्हाव्यात यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत .दरम्यान याबाबत निवेदन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे यांना निवेदन देण्यात आले.
तीन दिवस आंदोलन करण्याचा इशारा जगन सोनवणे यांनी केल्याप्रमाणे शनिवारी लोटांगण आंदोलन करण्यात आले . प्रसंगी मागण्या त्वरित मान्य न झाल्यास सोमवार दिनांक 24 जून रोजी रिक्षा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. राष्ट्रीय रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष जगन सोनवणे यांनी केलेल्या या लोटांगण आंदोलना मुळे अचानक काहीकाळ वाहतुकीला खोळंबा झाला शहर पोलिसांनी त्वरित धाव घेऊन आंदोलकांना रस्त्यावरून उठवून त्यांचे गा-हाने ऐकले आणि वाहतूक सुरळीत केली