आरक्षण नाही तर मतदान नाही राज्यातील धनगर समाजाचा पवित्रा

0

जळगाव-
खोटी आश्वासने देवून आरक्षणाच्या न्याय हक्कापासून धनगर समाजाला वंचित ठेवणार्‍या राज्यकर्त्यांविरोधात मल्हार सेनेने आरक्षण नाही तर मतदान नाही असा पवित्रा घेतला आहे. अशी माहिती मल्हार सेनेच्या वतीने रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष लहु शेवाळे, विठ्ठल शिंगाडे, रंजना बोरसे, विठ्ठल शिंगाडे, सुकलाल धनगर, सुरेश मंत्री, संजय गढरी, आबा रावते, दिपक गढरी, भिमराज पवार, बापू लोणेकर, प्रकाश थोरात,श्री. घोडके आदी उपस्थित होते.
औरंगाबाद येथे दि. 24 मार्च रोजी धनगर समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची घोषणा करण्यासाठी रविवारी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पत्रकार भवनात आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर माहिती देताना लहु शेवाळे यांनी सांगितले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्येच राज्यातील धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण दिले आहे. मात्र राजकारण्यांनी धनगर समाजाला आरक्षणापासून दूर ठेवले आहे. 2014 मध्ये भाजपनेही आश्वासने देवून मते लाटली मात्र आरक्षण दिले नसल्याने धनगर समाजात असंतोष पसरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.