आय ए एस अधिकार्‍यांच्या राज्यात बदल्या

0

जळगाव – राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य प्रशासनाने गुरुवारी केल्या असून यात मनीषा पाटणकर म्हैसकर, सी.के.डांगे, एम.डी.पाठक आदींचा समावेश आहे.

मनीषा पाटणकर मस्करम्हैसकर प्रधान सचिव नगर विकास विभाग यांची नियुक्ती प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या पदावर झाली. तसेच श्रीमती जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे करण्यात आली तर एम डी पाठक प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा यांची नियुक्ती प्रधान सचिव नगर विकास-२ या पदावर तर डी एम मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी परभणीला तर डॉ व्ही एन सूर्यवंशी यांची नियुक्ती महापालिका आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याणला झाली व  सचिंद्र प्रताप सिंह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे यांची नियुक्ती आयुक्त पशुसंवर्धन पुणे येथे झाली. तसेच  सी.के. डांगे सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची नियुक्ती महापालिका आयुक्त मिरा भाईंदर महानगरपालिका या पदावर करण्यात आली असून सदर बदली प्रशासकीय करणावस्त झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.