आयुध निर्माणी येथील तरुणाची आत्महत्या

0

वरणगाव आयुध निर्मातील रहिवाशी एका तरुणाने हतनुर येथील पुलावरूण उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार रोजी घडली.

निर्माणी वसाहत मधील रहिवाशी व इंटक संघटनेचे अध्यक्ष रविंद्र देशमुख कॉ नं ३ टाईप / ४६ / ए यांचा एकुलता एक मुलगा प्रताप रविद्र देशमुख ( २६ ) हा शुक्रवार रोजी सायकाळी ६ वाजेच्या सुमारास एम एच १९ ए जी ८६५० या क्रमाकांची मोटरसायकल घेऊन घरात काहीही नसागता हतनुर धरणाकडे जाऊन पुलाचा जवळ आपली दुचाकी लावीत पुलावरून पाण्यात उडी मारूण आत्महत्या केली. शुक्रवार रोजी दुपारच्या वेळेस सावतर निभोरा गावाजवळ तापी नदीच्या किणारावर या तरुणाचा मृतदेह अढळून आला
या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला मयत प्रताप च्या नातेवाईकानी दिलेल्या खबरीनुसार अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास पो हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहे.

प्रताप देशमुख हा नुकताच बी ई चे शिक्षण घेतले होते व नौकरीच्या शोधत होता त्याच्या अचानक पणे निघुन जाण्याने आयुध निर्माणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.