आयुध निर्माणीतील कर्मचार्‍याची आत्महत्या

0

भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातल कंडारी येथील आयुध निर्माणीतील ५० वर्षीय कर्मचार्‍याने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि. २८ रोजी घडली.

शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, आयुध निर्माणीतील कर्मचारी अरुण नारायण निसाळकर (वय ५९, रा. सुभाष नगर, कंडारी) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि. २८ रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास घडली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत शहर पोलिस ठाण्यात रात्री अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, जवाई असा परिवार आहे. ते माजी पं.स. सदस्य संतोष निसाळकर यांचे मोठे बंधू तर पं.स. सदस्या आशा निसाळकार यांचे जेठ होते

Leave A Reply

Your email address will not be published.