आयुक्तांची बदली करा; सक्षम आयुक्त मनपाला द्या

0

जळगाव दि. 24-
विद्यमान आयुक्त हे बदलीच्या मानसिकतेत आहेत. त्याचा परिणाम मनपातील विविध निर्णय व कामांवर होत आहे. त्यांच्या जागी गेडाम किंवा तुकाराम मुंडे आदींसारखे सक्षम आयुक्त महापालिकेला द्या, अशी मागणी शहीद भगतसिंग संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
जळगाव महानगरपालिका होवून 16 वर्षे पुर्ण झाली आहेत. मात्र जळगाव मनपा ही मनमानी भोंगळ कारभाराचा नमुना आहे. मनपाचे प्रशासन पुणेपणे कोलमडले आहे. शहर हुडकोकडे गहाण ठेवणार्‍या 52 नगरसेवकांवर 1997 पासून 60 कोटी 32 लाख रुपये वसुली बाकी आहे. शहर हगणदारी मुक्त झालेले नाही. गाळेधारकांचा प्रश्न सुटलेला नाही. करवसुली व शासन अनुदान निधीचे नियोजन नाही. अतिक्रमण तोडताना पक्षपातीपणा केला आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांनी सरकारी अनुदानाचा गैरवापर केला आहे.
महासभा म्हणजे पैसा व वेळेचा अपव्यय
लोकप्रतिनिधी महासभेत एकमेकांचे पाय खेचण्यात स्वत:ला धन्य मानतात. कालचे सत्ताधारी आज विरोधक बनून केवळ विरोधच करीत असल्याचे दिसते. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात समन्वय नाही महासभा ही केवळ औपचारीकता राहिलेली असून केवळ पैसा व वेळेचा अपव्यय आहे.
मनपात प्रभारीराज लावलेले नाही. कर्मचार्‍यांचे निवृत्तीनंतरचे आर्थिक देय महिन्यांपासून प्रलंबित आहे. कर्मचार्‍यांना हक्काचे वेतन दरमहा मिळत नाही. प्रशासकीय कामात शिथिलता आली आहे. अनेक अधिकार्‍यांची पदे व जागा रिक्त असल्याने मनपात प्रभारीराज सुरु आहे. मनपा स्वायत्त असली तरी संस्थेसाठी शासन जामीनदार आहे. अशा समस्यांचा दिलेल्या निवेदनात पाढाच वाचलेला आहे. अनागोंदी कारभारामुळे नागरी व्यवस्था कोलमडणे या बाबी राज्य सरकारला शोभनीय नसून शासनाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. अन्यथा शासन पातळीवर, प्रशासकीय व्यवस्थेबाबत नागरिकांचा व कर्मचार्‍यांचा विश्वास उडेल, तरी पार्श्वभूमीचा गंभीरतेने सकारात्मक विचार होऊन सक्षम आयुक्त मनपात पाठवावा, अशी विनंती निवेदनाने करण्यात आली आहे.

प्रशासनाने प्रत्येक विभागात गुणवत्ता धोरण दर्शनी भागात

Leave A Reply

Your email address will not be published.