नवी दिल्ली – आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून हैदराबादमध्ये तीन तर वर्धा येथील एका ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने आज सकाळी छापे टाकले. या छाप्यामध्ये वर्धा येथील मसाळा परिसरातून तपास यंत्रणांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एनआयएच्या पथकाने शनिवारी सकाळी हैदराबादमध्ये तीन ठिकाणी तर वर्धा येथे मसाळा परिसरात छापा टाकला. ISIS शी संबंध असल्याच्या संशयातून एनआयएने ही कारवाई केल्या समोर येत आहे. या तपास यंत्रणेच्या पथकाने या चार ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली असून या कारवाईबाबत एनआयएने अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. मात्र वर्ध्याहून महिलेला का ताब्यात घेण्यात आले. छापा टाकला तेव्हा तिच्याकडे असं नेमकं काय सापडलं की तिला ताब्यात घेण्यात आलं. याबाबत माहिती मिळालेली नाही.
Telangana: NIA (National Investigation Agency) is carrying out searches at three locations in Hyderabad, against ISIS module. pic.twitter.com/JGXLZyCyJg
— ANI (@ANI) 20 April 2019