मुक्ताईनगर :- तालुक्यातील पूर्णाड फाटा ते दुई दरम्यान असलेल्या राशा बर्डी जवळ आयशर आणि मोटार सायकल यांच्यात झालेल्या अपघातात नरवेल तालुका मलकापूर येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी सोमनगाव येथील रहिवाशी तसेच नवीन माध्यमिक विद्यालय सुकळी येथे शिपाई म्हणून कार्यरत असलेले सतीश ओंकार सोनवणे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील रहिवाशी असलेले किरण काशिनाथ सुरळकर वय 28 वर्षे हे सुकळी येथील सतीश सोनवणे यांचे मामेभाऊ आहेत किरण काही कामानिमित्त सुकळी येथे आले आणि त्यांनी सतीश सोनवणे या मामे भावाचे भेट घेतली आणि त्यानंतर किरण सुरळकर हे त्यांच्या एम एच 28 ए वाय 58 14 या हिरो होंडा एचएफ डीलक्स या मोटरसायकलवर मुक्ताईनगर कडे येण्यास निघाले असता दुई व पूर्णाड फाटा दरम्यान असलेल्या राशाबरडा जवळ समोरून आयशर कंपनीचे अवजड वाहन क्रमांक एम. एच. 04 / एफ. जे. 7205 वेगाने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून येत होते यावेळेस या आयशर गाडी ने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरात धडक दिल्याने त्यात मोटारसायकल स्वार किरण काशिनाथ सुरळकर वय 28 वर्षे यांच्या डोक्यात जबर जखम झाल्याने यांचा जागीच मृत्यू झाला.
मदतीचा हात –सदर घटनेची वार्ता समजता बरोबर दुई सुकळी सोमनगाव येथील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली व मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला कळविले त्यानंतर मयतास घटनास्थळावरून उचलून मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले सदर प्रसंगी पंचायत समिती सदस्य विकास समाधान पाटील धुळे येथील ग्रामस्थ प्रताप कोचुरे यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात दिला याठिकाणी तसेच उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला होता मयताच्या पश्चात मुलगा मुलगी पत्नी आई वडील असा परिवार आहे दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे