आयडीबीआय बँकेत ७७२ कोटींचा घोटाळा

0

मुंबई –

सरकारी बँकांतून झालेले कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार एकामागून एक उघडकीस येत आहेत. बुधवारी आयडीबीआय बँकेने तिच्या तेलंगण व आंध्र प्रदेशातील काही शाखांकडून सुमारे ७७२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे जाहीर केले. यामुळे आयडीबीआय बँकेने समभाग ३.५ टक्क्यांनी पडले.

आयडीबीआय बँकेत हा गैरव्यवहार आर्थिक वर्ष २००८-०९ ते २०१२-१३ या काळात झाला आहे. मत्स्यशेतीसाठी तत्कालीन आंध्रप्रदेशांतील हैदराबादेतील बशीरबाग, गुंटूर, राजामुंद्री, भीमावरम व पालांगी येथील बँकेच्या शाखांतून गैरप्रकारे कर्जे दिली गेल्याचे उघड झाले आहे. अधिक चौकशी केल्यावर या सर्व कर्जांची रक्कम ७७२ कोटी रुपये होत असून यातील बरीचशी कर्जे काही उद्योजकांनी घेतली आहेत. या पाचही शाखांतून वितरित झालेल्या कर्जांपैकी बहुतांश कर्जांसाठी हे उद्योजक हमीदार राहिले होते. यातील बरीचशी कर्जे मत्स्यतळे खोदण्यासाठी दिली गेली. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीच मत्स्यतळी तयार करण्यात आली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या कर्जप्रक्रियेत तारण म्हणून ठेवण्यात आलेल्या मालमत्तांची किंमतही फुगवून सागितली गेली. कर्डे मंजूर करण्यामध्ये अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा हात होता असेही आता स्पष्ट होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.