Sunday, January 29, 2023

आम्ही केलेल्या कामाची पावती मतदारांनी दिली ː रोहिणी खडसे- खेवलकर

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी विजय मिळवला आहे.

जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ११ जागा आधीच बिनविरोध झाल्या. यात महिला गटातून आघाडीच्या सहकार पॅनलतर्फे विद्यमान अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर आणि छायादेवी दिलीपराव निकम यांना उमेदवारी मिळाली. या दोन्ही जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले तरी याला यश आले नाही. यामुळे अखेर या प्रवर्गासाठी निवडणूक घेण्यात आली. अर्थात, सहकार पॅनलची ताकद पाहता येथून रोहिणी खडसे यांचा विजय हा अगदी सहजसोपा असल्याचे मानले जात होते.

- Advertisement -

थेट लाईव्ह👇

https://www.facebook.com/lokshahilive/videos/447895870023975

 

आज झालेल्या मतमोजणीत रोहिणी खडसे-खेवलकर यांना तब्बल २२००चा लीड मिळाला असून त्यांचा विजय निश्‍चीत आहे. त्या लागोपाठ दुसर्‍यांदा जिल्हा बँकेत संचालक म्हणून दाखल झाल्या आहेत.

यावेळी त्या म्हणाल्या की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या सर्व जागा निवडून आल्याने मतदार तसेच तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आम्ही केलेल्या कामाच्या पावती देत पॅनलवर विश्वास ठेवत आम्हाला निवडून दिलं. हा विजय सर्व सभासदांचा आहे.

 

 

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे