Thursday, September 29, 2022

आम्हीही आता दोनाचे तीन होतोय, विराट-अनुष्काच्या घरी जानेवारीत नव्या पाहुण्याचं आगमन

- Advertisement -

नवी दिल्ली : भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी आज एक गुड न्यूज तमाम देशवासीयांना दिली आहे.  ‘आम्ही दोनाचे तीन झालोय,’ असं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत त्यांनी ही गुड न्यूज दिली आहे. जानेवारी २०२१ मध्ये घरी पाळणा हलणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे.

- Advertisement -

विराट आणि अनुष्का यांचा २०१७ साली प्रेमविवाह झाला आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असून मनोरंजन आणि क्रीडाक्षेत्रासाठी त्यांनी दिलेलं योगदानही मोलाचं आहे. हार्दिकच्या गुड न्यूजनंतर विराटलाही त्याच्या गुड न्यूजविषयी विचारणा होत होती. अखेर आज विराटने त्यावरील चुप्पी तोडत देशवासीयांना आपण बाबा होणार असल्याचा सुखद धक्का दिला आहे.

- Advertisement -

- Advertisement -


यंदाच्या लॉकडाऊनमध्ये अनेक भारतीयांनी अशा गुड न्यूज दिल्या आहेत. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला. हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोविक यांनाही मागील महिन्यात पुत्रप्राप्ती झाली आहे. एकूणच भारतीय क्रिकेट खेळाडूंचे यावर्षी अच्छे दिन आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या