भुसावळ | प्रतिनिधी
आ संजय सावकारे यांच्या यशस्वी पाठपुराव्या मुळे दिपनगर येथील 32 प्रकल्पग्रसत्तांनाना मिळाला न्याय दिपनगर येथे काम करीत असलेल्या 32 प्रकल्पग्रस्तांना कुठलेही कारण न दाखवता कामावरून कमी करण्यात आले होते. त्या मुळे 32 परिवारावर बेरोजगारी चे संकट आले होते. त्यांनी आपली व्यथा आ .संजय सावकारे यांचे कडे मांडून योग्य न्याय मिळवून देण्यास विनंती केली होती . याची आमदार सावकारे यांनी त्वरित दखल घेत मुख्य कार्यालयातून सर्व माहिती मागवून मुंबई येथे ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या सोबत संपर्क साधून बैठक आयोजित केली व दिपनगरातील 32 प्रकल्पग्रस्ताना न्याय मिळावा अशी मांगणी केली. याची त्वरित दखल घेत ना बावनकुळे यांना तत्काळ सूचना देऊन सर्व 32 प्रकल्पग्रस्तानां त्वरित कामावर राजू करण्याचे आदेश दिले व त्यानुसार मुख्यकार्यालयातून या संबंधित आदेश पारित झाले आणि 32 कुटुंबांना आमदार सावकारे पाठपुराव्याने न्याय मिळाले.त्याच बरोबर आमदार हतनूर येथील सबस्टेशनचे काम देखील तातडीने पूर्ण व्हावे अशी मांगणी व विनंती केली आहे यावर ना बावनकुळे यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम पूर्ण करण्या करिता येत्या 15 दिवसात टेंडर काढण्याच्या सूचना दिल्या यामुळे हतनूर, टाहकळी, कठोरा,सावतरनिंभोरा,काहूरखेडा,मानपूर इत्यादी गावकऱ्यांना लाभ होणार आहे.