चाळीसगाव:-(प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील गावागावात आमदार मंगेशदादा चव्हाण व शेतकऱ्यांना वीज आंदोलनावरून झालेल्या अटकेच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात असंतोष पसरत आहे. हे शेतकरी योद्धे आपल्यासाठी गेल्या ५ दिवसांपासून तुरुंगात आहेत, यासाठी गेल्या काही दिवसांपासून गावागावात आंदोलन केली जात आहेत. चाळीसगाव तालुक्यातील कृष्णापुरी तांडा या गावात सर्व ग्रामस्थांनी मिळून चूलबंद आंदोलन करून ठाकरे सरकारचा निषेध केला.

गावात एकाही घरात चूल न पेटवून मंगेश दादा व शेतकरी आंदोलकांना अभिनव पध्दतीने समर्थन कृष्णापुरी ग्रामस्थांनी केले. आमदार मंगेशदादांचा काही त्या अधिकाऱ्याशी वैयक्तिक वाद नव्हता मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र भावनांना त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून जागा मोकळी करून दिली. त्यामुळे ठाकरे सरकारने शेतकरी आंदोलकांची लवकर सुटका न केल्यास आम्ही प्रत्येक तांड्या तांड्यातून जेलभरो आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.
नंतर गावकऱ्यांनी मेणबत्ती पेटवत एकत्र येत आमदार मंगेशदादा चव्हाण व शेतकऱ्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना केली. यावेळी प्रविण राठोड, रुपसिंग जाधव, सागर राठोड, अशोक जाधव, शाणीबाई राठोड, कमलाबाई राठोड, दोलीबाई राठोड, राजेंद्र राठोड, रवी जाधव विलास राठोड व समस्त कृष्णापुरी ग्रामस्थ उपस्थित होते.

