मुक्ताईनगर : कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिम सुरू आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाची लस घेतली आहे. मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात यांनी लस घेतली आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश राणे यांच्या उपस्थितीत अधिपरीचारिका श्रीमती सुरेखा देशमुख -पवार यांच्या हस्ते त्यांनी को-व्हॅक्सिन (कोविडशिल्ड) लस घेतली.
60 वर्षांपुढच्या नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम 1 मार्चपासून सुरू झाली आहे. ज्यांना इतर काही मोठे आजार आहेत अशा 45 च्या पुढच्या नागरिकांनाही या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यासाठीचं रजिस्ट्रेशन CoWin पोर्टलवर सुरू झालं आहे.
या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. सोबतच 45 वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे.
कोविडशिल्ड लस प्रभावी आहे नागरिकांनी कोरोनापासून बचावासाठी लस घेण्यासाठी स्वतः हुन पुढे यावे तसेच मास्क चा वापर नेहमी करा असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.