पाचोरा (प्रतिनिधी) : येथील शिवसेना – भाजपा महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांनी दि. 10 रोजी तारखेडा – गाळण – विष्णूनगर या भागात आपला झंझावती दौरा करून परिसरातील जनतेचे आशीर्वाद घेतले. आमदार किशोर पाटील यांना जनतेचे प्रचंड प्रतिसाद मिळत असून, शिवसेना – भाजपा महायुतीचे तसेच आमदार किशोर पाटील यांच्या विकास कामाबाबत जनता खुश असून पुन्हा किशोर पाटील हेच आमदार म्हणून विजय होतील असा संकल्प या परिसरातील जनतेने केला आहे. या परिसरातील जनतेने आमदार पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले. तसेच माता भगिनींनी प्रत्येक घरातून औक्षण करीत आमदार पाटील यांचे स्वागत केले. आजच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर पाटील, डॉ. भरत पाटील, प्रल्हाद भाऊसाहेब पाटील, रामू पाटील, भरत पाटील, गोपाल पाटील,गजू पाटील, छोटू अप्पा, वाल्मिक पाटील,गणेश खराटे, राजेंद्र पाटील, वाघू गुरुजी, धनराज पाटील, सचिन गुजर, शरद पाटील, विठ्ठल पाटील, दशरथ पाटील, द्त्तू पाटील, आनंदा पाटील, सुपडू पाटील, नवल गुजर,अण्णा पाटील, किशोर धनगर, रामदास सुतार आदी पदाधिकारी सह ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते.