आमडदे येथील जि.प.शाळेला एका अनोखा दातृत्वाचा सुखद अनुभव

0

भडगाव – प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातील आमडदे येथील जि.प.शाळेला एक अनोखा दातृत्वाचा प्रत्यय आला.या शाळेत इ.१ली ते ४थी पर्यंतचे सर्वसाधारण कुटूंबातील मुले मुली नियमित शिक्षण घेतात.ह्या शाळेत काही भौतिक बाबी हया अपूर्ण होत्या त्यात शाळेला पाणी पुरवठा करणारी बोअर ला जलपरी मोटर व त्याला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन नव्हती तसेच शाळेत डिजिटल  कक्षाला पडदे नव्हते, विद्यार्थ्यांना वर्गात खाली बसतांना कार्पेट नव्हती.यासह अनेक बाबींची अपूर्णता होती…सदर बाब आमडदे येथील सरपंच प्रताप हरि पाटील यांना समजली  त्यांनी तात्काळ शाळेला   पंचवीस हजारांची रू देणगी देण्याचे ठरवले व तात्काळ शाळेला भेट देऊन २५०००/- रोख स्वरूपात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नलिनी पाटील यांचे कडे सुपूर्द केले. सदर प्रसंगी  केंद्रप्रमुख अशोक खेडकर, आमडदे येथील ग्रामसेवक ए. जे पाटील,उपशिक्षक प्रवीण सोनार हे उपस्थित होते.प्रताप पाटील यांनी  केलेल्या आर्थिक मदतीने सर्वजण भारावून गेले व शाळेच्या वतीने त्यांच्या दातृत्वाचे मनापासून आभार मानले.
श्री.प्रताप हरि पाटील हे स्वत: एक संस्थाचालक आहेत त्यांच्या भडगाव तालुक्यात अनेक अनुदानित, विनाअनुदानित सुसज्ज अशा शाळा आहेत.परंतू खाजगी शाळाबरोबर सरकारी शाळा देखील टिकल्या पाहिजेत व त्या शाळांमधून देखील एक चांगलं व दर्जेदार शिक्षण दिल गेलं पाहिजे ह्या उदात्त हेतूने त्यांनी जि.प.शाळेला मदत केली.त्यांनी एका जि.प शाळेला दिलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.प्रताप पाटील ह्यांनी यापूर्वी ही अनेक सामाजिक संस्था,अनेक असहाय्य गरजूंना वेळोवेळी मदत केली आहे.त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून आपल्या वाढदिवसावर होणारा अवाढव्य खर्च टाळून व वाढदिवस अत्यंत साधेपणाने करून वाचलेली रक्कम कधी केरळ व कोल्हापूर ग्रस्तांना दिली तर कधी भडगाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून आर्थिक मदत केलेली आहे.आणि ह्या आमडदे येथील एका सरकारी शाळेला  दिलेली मदत त्यांच्यातल्या खऱ्या माणूसकीच  वेगळेपण अधोरेखित करते.

Leave A Reply

Your email address will not be published.