नगर : लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज आपल्या एका वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यांनी एका कीर्तनात सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते तसेच टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब होते, असे वक्तव्य केले होते.
दरम्यान, आता इंदुरीकर महाराज यांच्या समर्थनार्थही अनेक लोक पुढं येऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी आंदोलनं करण्याची चाहत्यांची तयारी सुरू आहे. मात्र, खुद्द इंदुरीकर महाराजांनी चाहत्यांना त्यापासून रोखलं आहे. “आपल्यासाठी कुणीही मोर्चे… आंदोलनं करू नये” असं आवाहन इंदुरीकरांनी पत्रकाद्वारे केलं आहे.