आनंदाची बातमी ! ७३ दिवसांत भारतीयांना मिळणार कोरोना लस

0

नवी दिल्लीः भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ ७३ दिवसांत बाजारात उपलब्ध होईल. कोविशिल्ड पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात येत आहे. तर राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकार भारतीयांना कोरोनाची मोफत लस देणार आहे.

पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी बिझनेस टुडेला मुलाखत देताना सांगितले की, भारत सरकारने आम्हाला विशेष संशोधन प्राधान्य परवाना दिला आहे. या अंतर्गत, आम्ही चाचणी प्रोटोकॉलची प्रक्रिया वेगवान केली आहे जेणेकरुन चाचणी ५८ दिवसात पूर्ण होईल. अशा प्रकारे, तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचा पहिला डोस शनिवारी देण्यात आला आहे. दुसरा डोस २९ दिवसांनी दिला जाईल. चाचणीचा अंतिम डेटा दुसरा डोस दिल्यानंतर १५ दिवसांनंतर येईल. यानंतर आम्ही कोविशिल्डला व्यावसायिक वापरासाठी बाजारात आणण्याचे विचार करत आहोत असं ते म्हणाले. यापूर्वी या लसीची चाचणी पूर्ण होण्यासाठी ७ ते ८ महिने लागतील असं सांगितले जात होते.

१७ केंद्रांवर १६०० लोकांमध्ये चाचणीला सुरूवात
चाचणी प्रक्रियेला आतापासूनच वेग आला आहे. कोविशिल्ड लशीची चाचणी १७ केंद्रांमधील १६०० लोकांमध्ये २२ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये, प्रत्येक केंद्रातील सुमारे १०० लोकांवर कोरोना लशीची चाचणी घेण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.