आनंदाची बातमी ! मान्सून कोकणात दाखल

0

दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात बरसणार

मुंबई : बहुप्रतीक्षेत असलेला मान्सून अखेर आज कोकणात दाखल झाला आहे. हा मान्सून दक्षिक कोकणमध्ये सक्रीय झाला असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.

वायू वादळामुळे मान्सून महाराष्ट्रात काहीशा उशिराने दाखल झाला आहे. दरम्यान, कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी लावली आहे. काल रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पहिल्या पावसाचा फटका रत्नागित मुंबई-गोवा महामार्गाला बसला. मोरी खचल्याने मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक खोळंबली होती.

आज हवामान खात्याने मान्सून कोकणातील आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील भागात दाखल असल्याचे जाहीर केले. आगामी दोन-तीन दिवसात राज्यातील काही भागातील हवामान पावसाची अनुकूल असणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान मान्सूनचे आगमन रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणी होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात पाऊस पडण्यास सुरूवात होईल, असे होसाळीकर यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.