आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण समारंभाला लवकरच सुरवात
जळगाव | प्रतिनिधी
जळगावात जैन हिल्स् येथे पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण समारंभाला लवकरच सुरवात होत आहे. समारंभ स्थळी ५ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांची उपस्थिती आहे.
सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे जैन हिल्स् वर आगमन झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते गौरव होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शरद पवार भुषविणार आहेत. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागता साठी विदेशी पाहुण्यांचे विशेष उपस्थिती आहे.