मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप युतीच्या जोरदार चर्चा सुरु असतानाच भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. काल संध्याकाळी 7 वाजता ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मनसे ९ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा काढत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मनसेने आपली भूमिका बदललेली आहे. मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्यावरुन वाटचाल सुरु केल्याने त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. त्या अनुषंगाने या दोघांमध्ये चर्चा झाल्याची चिन्हं आहेत. काल सायंकाळी ७ वाजता आशिष शेलार ‘कृष्णकुंज’वर आले होते. त्यावेळी सुमारे १ तास राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची बैठक झाली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली होती.