Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»आदेशानंतरही ट्रामा सेंटरमध्ये नॉन कोविड रुग्ण सेवा रखडली ; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशाला केराची टोपली
    ताज्या बातम्या

    आदेशानंतरही ट्रामा सेंटरमध्ये नॉन कोविड रुग्ण सेवा रखडली ; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशाला केराची टोपली

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 22, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ  – शहरातील ट्रामा सेंटरला नॉन कोविड सुविधा मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी वैद्यकिय आघाडीचे संयोजक डॉ.नि.तु.पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांनी ११  नोव्हेंबर रोजी ट्रामा सेंटरला नॉन कोविड सेवा देण्याचे आदेश दिले होते मात्र तब्बल १० दिवस उलटूनही आदेशाचे पालन न झाल्याने स्थानिक प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

    भुसावळ ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या कोरोना संक्रमित रुग्ण आहेत तर ट्रामा सेंटरच्या इमारतीमध्ये केवळ आरटीपीसीआर चाचणी घेतल्या जातात. केवळ या चाचणीसाठी ट्रामा सेंटरची इमारत अडकवून ठेवण्यात आली होती. याबाबत भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार ट्रामा सेंटर नॉन कोविड करून सेवा सुरू करण्यात आली आहे. या मागणीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांनी 11 नोव्हेंबर रोजी आदेश देत ट्रामा सेंटर नॉन कोविड रुग्णांसाठी वापरण्याचे निर्देश दिले होते मात्र स्थानिक मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.देवर्षी घोषाल यांनी याबाबत आदेश पाळले नाहीत. 11 दिवस उलटूनही ट्रामा सेंटरमध्ये नॉन कोविड सुविधा सुरु झालेली नाही. अद्यापही या ठिकाणी केवळ स्वॅब घेतले जात आहेत. या कामासाठी संपूर्ण इमारत अडकवून ठेवली जात आहे. याबाबत शनिवारी भारतीय जनता पार्टी वैद्यकिय आघाडीचे संयोजक डॉ.नी.तु.पाटील यांनी पाहणी कररून येथील दुर्दशेचीही पाहणी केली. या संदर्भात त्यांनी डॉ.चव्हाण यांच्याशी संपर्क साधून आदेशाची अंमलबजावणी का होत नाही? याबाबत तत्काळ कार्यवाही करुन रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणीही डॉ.नी.तु.पाटील यांनी केली आहे.

    ट्रामा केअर सेंटर नॉन कोविड सुविधा दिल्यास शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना सुविधा मिळेल. सध्या शहरातील पोलिसांना आरोपी, कारागृहातील कैदी यांना वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथील शिरसोली रोडवरील रुग्णालयात घेवून जावे लागते. यामुळे पोलिस यंत्रणेचा त्रास आणि वेळ वाया जातो. ट्रामा केअर सेंटरमध्ये इतर रुग्णासाठी उपचाराची सोय तसेच आरोपींची वैद्यकिय तपासणी सुरू झाल्यास पोलिसांना दिलासा मिळेल, अशी मागणीही भाजप वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि. तु.पाटील यांनी केली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif