आदिवासी स्वाभिमानी संघटनेची कार्यकारिणी जाहीर

0

 पाचोरा (प्रतिनिधी) : आदिवासी आश्रम शाळा स्वाभिमानी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघाची नूतन कार्यकारिणी राज्याध्यक्ष भरत पटेल यांनी नुकतीच जाहीर केली. यावेळी जिल्हाध्यक्षपदी संभाजी सिताराम पाटील यांची निवड करण्यात आली.

जिल्ह्यातील आदिवासी विकास कार्यालयांतर्गत अनुदानित आश्रम शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक जळगाव येथील आदिवासी पतपेढी येथे नुकतीच पार पडली. यावेळी राज्य कार्यकारिणीचे सदस्य लोकेश पाटील, राज्य उपाध्यक्ष हिरालाल पवार, खजिनदार विजय कचवे, राज्य कार्यवाहक रमेश चव्हाण, राज्य सदस्य विभागीय सल्लागार सुरदास उपस्थित होते.

यावेळी आश्रमशाळेतील कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय  होणार नाही. याची काळजी घेण्यात येईल. असा ठराव पास करण्यात येऊन इतरही ठराव पारीत करण्यात आले.

यामध्ये जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील, उपाध्यक्ष प्रवीण बिरारी, विष्णू नारखेडे, कार्यवाहक संजय अलोने, सहकार्यवाहक आबा पाटील, खजिनदार बद्रीप्रसाद चौधरी, प्रसिद्धीप्रमुख उत्तमराव मनगटे (पाटील), महिला आघाडी उर्मिला लहू पाटील, दिपाली बाळाजी खैरनार, सर्व सदस्य वसंत पाटील, सुभाष गाढे, दिनकर पाटील, रजनिकांत भांमरे, शरद वाल्मिक सूर्यवंशी, सतीश पाटील, विवेक पाटील, अजित वाघ, कुंदन भालेराव, पंकज पाटील, मोहन पाटील, प्रमोद पाटील यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.