आदिवासी सुरक्षा रक्षक संघटनेची बैठक संपन्न

0

पारोळा | प्रतिनिधी

पारोळा तालुक्यातील लोणीसीम आदिवासी भिल्ल समाजाची मिटिंगसंपन्न झाली ,या मिटिंगला अनिलभाऊ मोर व रविंद्र वाघ यांनी अनेक महत्वाच्या विषयांसंबंधी बोलले आदिवासिंवर होणारे अन्याय, अत्याचार, आदिवासिंचे होणारे शोषण, आदिवासींच्या विरोधात होणारे कायदे व धोरण तसेच आदिवासीचा धर्म, भिल्ल समाजातील अज्ञानपणा व अशिक्षितपणा मुळे  समाजात येण्याऱ्या अडचणी, अशा अनेक मुद्दयांवर आदिवासी भिल्ल समाजाला मार्गदर्शन केले त्यांचे अशा प्रकार चे  विचार ऐकून सर्व उपस्थित  समाज बांधवांनी  अनिलभाऊ मोरे यांचे खूप कौतुक केले.त्यानंतर येत्या ११ एप्रिलला शिंदखेडा जिल्हा धुळे येथे होणाऱ्या भिल्ल समाज प्रबोधन महासंमेलन 2020 या कार्यक्रमला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण अनिल मोरे यांनी उपस्थित समाज बांधवांना दिलेले आहे. आणि आलेल्या सर्व समाज बांधवांनी पारोळा तालुक्यातील विखुरलेला व असंघटित समाजाला एकत्र करून यांना साथ देण्याचे आश्वासन दिले आहे.  लोणीसीमच्या तिन्ही गावांचे मा. सरपंच व त्यांचे सदस्य, ग्रामस्थ बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच माजी जि. प. सदस्य मा. श्री. दगडू पवार सर, सुनिलभाऊ पिंपळे, मालेगाव, अरुणभाऊ पवार,  मनमाड,  मुन्नाभाऊ गोधडे, मनमाड, रवींद्र वाघ, धाबे पारोळा, शिवा भाऊ सोनवणे, रामचंद्र मोरे, लोणीसीम, बाळूभाऊ मालचे, पारोळा आदी सर्व मान्यवर या मिटिंग साठी उपस्थित होते, आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार आणि स्वागत आदिवासी सुरक्षा रक्षक समितीचे तालूका अध्यक्ष श्री रवींद्र वाघ व रामचंद्र मोरे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.