Sunday, November 27, 2022

आदिवासी माता पालकांना शिक्षणाबाबत जागृत करावे – साहेबराव पाटील

- Advertisement -

पारोळा प्रतिनिधी  –  तालुक्यातील शेळावे येथे २७ रोजी जि प प्राथमिक शाळा धाबे ता पारोळा या ठिकाणी लेक वाचवा लेक शिकवा व नारी सन्मान म्हणुन पारोळा शहराचे निवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक साहेबराव रतन पाटील यांनी पाच गरीब विद्यार्थी पालक मातांचा सत्कार करून त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन म्हणुन सुंदर साळी चोळी वाटप केल्या . तसेच सर्व उपस्थित बालकांना शेवचिवडा खाऊ वाटप केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेळावे केंद्र प्रमुख जितेंद्र पवार व प्रमुख पाहुणे म्हणुन पत्रकार अभय पाटील उपस्थित होते.

- Advertisement -

साहेबराव पाटील यांनी माता पालकांसह शाळेचे वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणुन शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ देवुन .सत्कार केला . शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी अनुताई भिल , रेखा भिल , सुनिता पाटील , सुरेखा भिल , अनिता भिल यांना साळी चाळी भेट दिली . सर्व महिलांना खुप आनंद वाटला .

- Advertisement -

- Advertisement -

मुख्याध्यापक साळुंखे व केंद्र . प्रमुख पवार यांनी साहेबराव पाटील यांचे आभार व गौरव करतांना सांगितले की नानासाहेब एक आदर्श व व्रतस्थ शिक्षक नंतर ग्रेडेड मुख्याध्यापक म्हणुन जीवनभर कार्यरत आहेत . त्यांचा अमृत मोहत्सव ते एक सामाजिक बांधिलकी व प्रेम म्हणुन धाबे या आदिवासी गावात साजरा करणार होते .पण त्याच महिन्यात प्रकृती बिघडल्याने नियोजित कार्यक्रम रद्द झाला . आज त्यांनी या कार्यक्रमाचे शाळेवर आयोजन करुन माता पालकांशी छान संवाद साधला . त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असुन प्रेरणादायी आहे .

या प्रसंगी साहेबराव पाटील म्हणाले की धाबे गावात येवुन मला आनंद वाटला . शाळा व शिक्षकही पाच सात वर्षापासुन छान कार्य करीत आहेत . विद्यार्थी माता पालकांनी जांगृत होवुन आपल्या बालकांच्या शिक्षणाकडे .लक्ष दयावे . माताच प्रथम गुरू असते . बालक शाळेत गेला का नाही ?घरी अभ्यास करतो का याकडे लक्ष दयावे . लेकीला जन्माला येवु दया व तीला चांगले शिक्षण दया. यावेळी बहुतेक माता पालक , ग्रामस्थ , विदयार्थांसह शाळा व्यवस्थापन अध्यक्ष युवराज भिल, अंगणवाडी सेविका म्हाळसा भिल, जेष्ठ नागरिक गुलचंद भिल व दंगल भिल उपस्थित होते. सूत्रसंचलन वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील व प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी केले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या