फैजपूर वार्ताहर – सातपुड्याच्या कुशीतील गावांचा वनदावे जलदगतीने निपटारा करण्यासाठी मोहिमेअंतर्गत तात्काळ निपटारा होऊन आदिवासी बांधवांना हक्काचा न्याय मिळून देण्यासाठी 26 व 27 रोजी वनमित्र मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी संबंधित गावातील ग्रामस्थ वन हक्क समितीने सर्व दाव्यास सह उपस्थित राहण्या बाबत सूचना प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी स्वामी समर्थ मंगल कार्यालयात वन मित्र मोहिमेत बोलतांना केले.
फैजपूर उपविभागावातील सातपुड्याच्या कुशीतील अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम अंतर्गत प्रारंभित असलेल्या वैयक्तिक दाव्यांच्या जलद गतीने निपटारा करण्यासाठी फैजपूर येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात काल दिनांक 26 जून रोजी व आज दिनांक 27 जून रोजी वनमित्र मोहीम राबविण्यात येत असून काल दिनांक 26 रोजी सातपुड्याच्या कुशीतील यावल तालुक्यातील जामन्या गाडऱ्या, लंगडाअंबा, उसमळी, हरिपुरा, रुईखेडा, मोहराळे तसेच रावेर तालुक्यातील कुसुंबे, लोहारा, जानोरी, मोहगण, तिड्या, अंधारमळी व पाल या चौदा गावांची पडताळणी होती त्यापैकी तिळ्या, अंधारमळी, मोहमांडली या तीन गावांनी दावे आणल्याने पडताळणी सुरू आहे .
अकरा गावांनी पूर्ण दाव्या सह व आवश्यक कागदपत्रांसह आज दिनांक 27 रोजी उपस्थित राहण्याबाबत प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी सूचना संबंधितांना दिल्या तर आज 27 ला सावखेडा सिम, वाघझीरा, आंबापाणी, वड्री, चारमळी, हिंगोणा, गारबरडी, गौरखेडा, निमबड्या, सहस्त्रलिंग, लाल माती व मोहमांडली या अश्या २२ गावांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या या मोहिमेत लोकसंघर्ष मोर्चा अध्यक्ष प्रतिभा शिंदे, सब डी एफ ओ.- एस एफ पवार, आर एफ ओ – व्ही एम पाटील यावल , आर एफ ओ- आर जी राणे रावेर , नायब तहसीलदार पी सी धनगर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी गावातील ग्रामस्तरीय वनहक्क समिती चे अध्यक्ष, सचिव, ग्रामसेवक, तलाठी, वनक्षेत्र, अधिकारी, वनपाल, वनरक्षक, यांच्यात समन्वय साधून वनमित्र मोहिमेत 150 च्या वर आदिवासी बांधवांसह उपस्थिती होती.
प्रलंबित असलेल्या वन दाव्या बाबतीत वनमित्र मोहीम राबविण्यासाठी वनहक्क साह्यक कलेश हातकर , मंडळ अधिकारी बंगाळे, तालुका व्यवस्थापक विजय पावरा, तलाठी एफ एस खान, संजू राजपूत, योगेश केदारे हे परिश्रम घेत आहेत.