आदिवासी उमेदवारांसाठी रावेर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन

0

जळगाव, दि. 22 –

 आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर जि. जळगाव च्या वतीने 1 एप्रिल, 2018 पासून प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांनी 28 मार्च 2018 पर्यंत आवश्यक ती कागदपत्रे कार्यालयाकडे जमा करावीत. असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, रावेर यांनी कळविले आहे.

या  प्रशिक्षणात आदिवासी उमेदवारांना विविध संस्थामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची (इंग्रजी / सामान्य ज्ञान/गणित/बौद्धिक चाचणी) तयारी करुन घेतली जाणार आहे. प्रशिक्षणाकरीता उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कमीत कमी एस. एस. सी. पास व वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार आदिवासी (अनु.जमाती) याप्रवर्गाचा असावा. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिन्याचा असून प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाकरीता इच्छुक उमेदवारांनी 28 मार्च, 2018 रोजी सकाळी 11 वाजता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. 2, शनि मंदीरामागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. याकरीता अनुसूचित जमातीमधील उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेचे मुळ प्रमाणपत्रे व जातीच्या प्रमाणपत्राच्या व त्यांच्या साक्षांकित झेरॉक्स प्रती, नाव नोंदणीचे ओळखपत्र आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो 28 मार्च 2018 पर्यंत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर या कार्यालयात जमा करावेत. यापूर्वी या कार्यालयामार्फत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी मुलाखतीस येवू नये.

प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. मुलाखतीसाठी कोणताही प्रवासखर्च दिला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहिती दुरध्वनी क्र. 02584-251906 वर संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, रावेर यांनी केले आहे.

०००

Leave A Reply

Your email address will not be published.