पाचोऱ्याची सभा महाराष्ट्रात रेकार्ड ब्रेक होणार- आमदार किशोर पाटील
पाचोरा :- शिवसेनेचे नेते तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे दिनांक १८ रोजी गुरुवारी ज्या नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान केले. त्यांचे आभार मानण्यासाठी व ज्यांनी मतदान केले नाही. त्यांचे मत परिवर्तन करण्यासाठी “जन आशिर्वाद यात्रा रथ” आणणार असुन जळगांव जिल्ह्यात जन आशिर्वाद यात्रेची सुरुवात प्रथम पाचोरा येथुन करण्यात येणार आहे. यासाठी संभाजी चौका शेजारील कृष्णाजी नगर येथील प्रांगणात सकाळी ११ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेची उपस्थिती ही संपूर्ण महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रा. गणेश पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अॅड. दिनकर देवरे शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, डॉ. भरत पाटील, नगरसेवक सतिष चेडे, महेश सोमवंशी, राम केसवानी, दादाभाऊ चौधरी, युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख अजय जैस्वाल, अनिकेत सुर्यवंशी, किशोर बारावकर, पप्पु राजपुत, संदिपराजे पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सकाळी ११ वाजता जळगांव येथे विमानाने आल्यानंतर पाचोरा येथे सभा घेतील. दुपारी २:३० वाजता भडगाव येथे जन आशिर्वाद यात्रेचे स्वागत, त्यानंतर पावणेतीन वाजता कासोदा, ३:१५ वाजता एरंडोल, ३:४५ वाजता धरणगांव येथे विजयी संकल्प मेळावा, सायंकाळी ६ वाजता चोपडा येथे मेळावा, साडेसात वाजता अमळनेर येथे जन आशिर्वाद यात्रा त्यानंतर धुळे येथे मुक्काम पाचोरा येथील जन आशिर्वाद मेळावा यशस्वी होण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी दि. १५ रोजी भडगांव व पाचोरा येथे शिवसेना आणि युवासेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पाचोरा मतदार संघातुन १ लाखा पैक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित ठेवण्याचे आश्र्वासन दिले. पाचोरा येथील सभेनतंर आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद रथास हिरवी झेंडी दाखविली जाणार आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने ठाकरे यांची सभा सारोळा रोड वरील समर्थ लाॅन्स येथे आयोजित करण्यात आली होती. परंतु ठाकरे यांनी सांगितले की, कितीही पाऊस झाला तरी मोकळ्या जागेतच सभा घ्यावी. अशी माहितीही आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.