Wednesday, May 18, 2022

आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने प्राचार्य डी.डी. पाटील सन्मानित

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी. आर. पाटील विद्यालय, इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे मुख्याध्यापक  प्राचार्य डी.डी. पाटील यांचे 34 वर्षाचे प्रदीर्घ सेवाकार्य, विद्यालयाच्या 2021 सुवर्ण महोत्सवी वर्षात 10 बोर्ड, विज्ञान शाखा, नर्सरी ते 4 थी इंग्लिश मेडिअम स्कूल, 5 वी ते 10 वी सेमी इंग्लिश व नॉन सेमी वर्ग, 11 सायन्स विज्ञान शाखा, कोरोना काळात क्षैक्षणिक प्रगतीसाठी परिश्रम, विद्यालयात कोविड प्रतिबंध विलगीकरण कक्ष व लसिकरण केंद्र,  भव्य दुमजली सुसज्ज इमारत इ. बाबत महत्वाच्या योगदनाची दखल घेत  स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती शिक्षण दिनानिमित्त दशकपूर्ती आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक  वाचनालय व ग्रंथालय कर्जोद रावेर रजि.महाराष्ट्र शासन यांचे वतीने आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष रंजना पाटील, एकरा एज्यूकेशन अध्यक्ष डॉ.करीम सालार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर, सन्मान पुरस्कार समिती अध्यक्ष शकील शेख आदि मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

सदर प्रसंगी विद्यालयाचे मा.प्र.मुख्या.बी.वाय.पाटील, सह शालेय व्यवस्थापन समिती प्रमुख एस.जे.पाटील, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील उपस्थित होते. सदर सन्मान पुरस्काराचे सारे श्रेय संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, सर्व संचालक मंडळ, शिक्षण विभाग, मार्गदर्शक सहकारी, मिडिया, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी सह सर्व सहकारी कर्मचारी यांना आहे. असे आदर्श मुख्याध्यापक सन्मान पुरस्कारार्थी प्राचार्य डी.डी.पाटील यांनी आवर्जून नमूद केले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या