आदर्श ग्रामविकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला सहकार्य करा – गुलाबराव देवकर 

0
गारखेडा, आनोरा व धानोरा येथे राष्ट्रवादी शाखेचे उद्घाटन
जळगाव ;- चांगले पक्के रंस्ते , शिक्षण , सिंचन व आरोग्याची चांगली व्यवस्था, रोजगाराच्या संधींचे आदर्श ग्रामविकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या निवडणूकीत कुणाच्या भूल -थापांना बळी न पडता आपण राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे. असे आवाहन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
      गारखेडा, आनोरा व धानोरा येथे दोन अशा राष्ट्रवादी युवकच्या चार शाखांचे उद्घाटना नंतर धानोरा येथिल जाहिर सभेच्या अध्यक्षस्थानावरून गुलाबराव देवकर बोलत होते . पुढे बोलतांना ते म्हणाले की, विद्यमान लोकप्रतिनिधींच्या गेल्या १४ वर्षाच्या तुलनेत आपण अवघ्या तीन सव्वातीन वर्षात कोटयावधींची भरीव व न होणारी ऐतिहासिक कामे पूर्ण केली आहेत. बारामतीच्या धर्तीवर आदर्श ग्रामविकास साधण्याचे आपले नियोजन आहे. ते पूर्ण करण्यासाठी आपल्या मतदान रूपी सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी सागितले. संध्याच्या ; युती शासनाला सर्वच स्तरावरील जनता  आज कंटाळली असून गावोगावी जनतेच्या उत्सुर्द प्रतिसाद  मिळत असल्याचे देखिल त्यांनी सागितले .
———––पुर्नगठणाच्या प्रश्नावर सहकार राज्य मंत्र्यांना अपयश ….
आजही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभ मिळालेला नाही. यावर तोडगा म्हणून जुन्या पिककर्जाचे पुर्नगठण करणे गरजेचे असते. स्वतः त्या विभागाचे मंत्री असून देखिल त्यांना या बाबत अपयश आल्याचे दिसते. त्यामुळे शेतकरी वर्गाची वाताहत होत असल्याची खंत देखिल आप्पासाहेबांनी यावेळी व्यक्त केली .
यावेळी विधान सभा क्षेत्र प्रमुख रमेश माणिक पाटील यांनी सहकार राज्य मंत्र्याच्या कारभारावर चौफेर फटकेबाजी करत चांगलीच पोल -खोल केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यध्यक्ष  विलास पाटील , तालुका अध्यक्ष धनराज माळी , युवकचे जिल्हाध्यक्ष ललीत बागुल, अध्यक्ष योगेश देसले, एन.बी. ठाकरे सर, आनोऱ्याचे शिवाजी पाटील यांनी देखिल मनोगत व्यक्त केले. जि.प. सदस्य रविंद्र पाटील ,राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील , डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील, युवक तालुका अध्यक्ष नाटेश्र्वर पवार , बाजार समिती उपसभापती रंगराव सावेत ,विदयार्थी संघटनेचे  तालुकाध्यक्ष विजय पाटील, धानोऱ्याचे मा.सरपंच गोपाळ बाविस्कर , चिंतामण बापू महाजन ,गारखेडयाचे किशोर पाटील,पष्टाणे सरपंच किशोर निकम, सोनवद मा.सरपंच बाळू आबा पाटील, चावलखेडा सरपंच राजू वाणी, साखरेचे उपसरपंच घनःश्याम पाटील , पिंपळ्याचे संजय पाटील आदि उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचलन लक्ष्मण पाटील सर यांनी तर आभार गोपाळ बाविस्कर यांनी मानले .
——-——शाखेची कार्यकारणी पुढील प्रमाणे :—–———–
गारखेडा : ..अध्यक्ष जामिल पटेल , उपाध्यक्ष अनिल ठाकरे , दिपक शिंदे , सदस्यामध्ये सचिन पाटील , आनंदा भिल्ल, दिपक महाजन, शशिकांत पाटील व सामिर पटेल
आनोरा : .. अध्यक्ष कल्पेश पाटील, उपाध्यक्ष अरूण पाटील, सचिव दिपक कापडणे , सदस्यामध्ये  मच्छींद्र पाटील , अमोल पाटील , गोपाळ देशमुख , दिपक महाजन , अनिल सातपूते, गोलू पाटील , ज्ञानेश्वर पाटील १ महेश पाटील ..
धानोरा जेष्ठ : .. अध्यक्ष रविंद्र पाटील, उपाध्यक्ष गणेश पाटील , सचिव प्रकाश चौधरी , सदस्यामध्ये भैय्या मराठे , गोपाळ महाजन, चंद्रकांत बाविस्कर , माधव महाजन , प्रभाकर मराठे व रामकृष्ण सोनवणे .
धानोरा युवक : .. अध्यक्ष सुनिल चौधरी, उपाध्यक्ष योगेश महाजन , सचिव विपूल महाजन , राजेंद्र भालेराव , नितीन वाघ , रामकृष्ण पाटील व कल्पेश महाजन यांच्या समावेश आहे . या सर्व पदाधिकाऱ्यांचे मा. आप्पासाहेब देवकर यांनी राष्ट्रवादीत स्वागत करत पक्षांचे ओळख पत्र वितरीत केले . कार्यक्रमास राष्ट्रवादीचे बहुसंख्ये पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रांमस्थ मोठया संख्येने उपस्थित होते .
Leave A Reply

Your email address will not be published.