निपाणे ता एरंडोल (वार्ताहर) : येथून जवळच असलेले आदर्श गाव ताडे येथे ग्रामस्थांच्या विषेश सहकार्याने ग्राम पंचायती ची निवडणूक तिन्ही वार्डात बिनविरोध केली आहे वार्ड क्रं, १ मध्ये देविदास पोपट पाटील बेबाबाई शिवाजी पाटील अक्काबाई राजेंद्र पाटीलवार्ड क्रं, २ मध्ये सखुबाई नाना धनगर पंढरी रामदास भिल रत्नाबाई बाप लोटन भिल वार्ड क्रं ३ मध्ये संभाजी दिनकर पाटील सचिन पंडित पाटील सुरेखा गोकूळ पाटील यांचा बिनविरोध मध्ये समावेश आहे.
सरपंच पदासाठी शासनातर्फे लवकरच १९ जानेवारी नंतर आरक्षण काढण्यात येणार असून सरपंच पदावर आता कोण बाजी मारणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.