आता विद्यार्थ्यांचीही बायोमेट्रिक हजेरी – विनोद तावडे

0

मुंबई : कॉलेजमध्ये गैरहजर असतानाही, त्याच्या नावाची हजेरी देऊन, म्हणजेच प्रॉक्सी लावणाऱ्या मित्रांना आता कायमचा चाप बसणार असून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक अटेंडन्स अनिवार्य करणार असल्याची घोषणा केली आहे.

विनोद तावडे दहावीच्या नवीन अभ्यासक्रमासंदर्भात मुंबईच्या दादरमध्ये पार पडलेल्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान विनोद तावडेंनी १३०० शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले. शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर विनोद तावडेंचा रोख होता.

बायोमेट्रीक अटेंडन्स ज्युनियर कॉलेजमध्ये कंपल्सरी करणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे. जवळपास राज्यातील तीस लाख विद्यार्थी सध्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. काही वर्षांपूर्वी पटसंख्येची गणना झाली असताना अनेक विद्यार्थी गैरहजर असल्याची बाब समोर आली होती. मुलांची जहेरी वाढवण्यासाठी तसेच बोगस कॉलेजेसला आणि विद्यार्थ्यांना चाप बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.