आता रेशनदुकानाचाही परवाना रद्द

0

प्रशासनाची बेधडक कारवाईचा धडाका सुरूच

जळगाव | प्रतिनिधी
 मद्यपान करुन धान्य वाटप यासह अनेक तक्रारी असलेल्या जळगाव शहरातील रामानंदनगर येथील विमल बाळासाहेब गायकवाड यांचे रेशन दुकानाचे प्राधीकारपत्र जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी आज गुरुवार रोजी   ही कारवाई केली आहे.
रामानंदनगर येथील रेशन दुकानाचे प्राधीकारपत्र असलेले विमल बाळासाहेब गायकवाड हे दिलेल्या वेळेत धान्य वितरण करीत नाहीत, रेशनकार्ड धारकांना १२ अंकी नंबर करीता पैशांची मागणी, मद्यपान करुन धान्य वाटप करणे, शासकीय नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे प्राधीकार पत्र रद्द करण्यात यावे व ते किशोर प्रल्हाद पाटील यांना चालविणेस द्यावे, असा अहवाल तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला होता. त्यानुसार पुरवठा अधिकारी यांनी प्राधीकारपत्र रद्द करण्यात असल्याचे आदेश गुरुवारी काढले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.