आता राज्यात परतलेल्या लोकांना क्वारंटाईन केलं जाणार नाही

0

पटना : परराज्यातून बिहारमध्ये परतलेल्या मजूर, विद्यार्थ्यांना आता क्वारंटाईन करण्यात येणार नाही. तसेच, राज्यातील सर्व ब्लॉक स्तरीय क्वारंटाईन सेंटर सुद्धा १५ जूनपासून बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने घेतला आहे. दरम्यान, बिहारमध्ये परतलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सोमवारपर्यंत राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले 3945 रुग्ण आहेत. यामधील जवळपास 2743 रुग्ण हे परराज्यातून आले आहेत. आपत्ती विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण 3 मे नंतर बिहारला परतले आहेत.

दरम्यान, बिहार सरकारने यापुढे राज्यात जे लोक येतील. त्यांची क्वारंटाईनसाठी नोंद केली जाणार नाही. बिहारमध्ये ५ हजार क्वारंटाईन सेंटर्समध्ये सोमवारपर्यंत परराज्यातून आलेल्या जवळपास १३ लाख लोकांची नोंद करण्यात आली आहे. आम्ही ३० लाखहून अधिक प्रवाशांना परत आणले आहे. सोमवारी संध्याकाळपासून नोंदणी बंद करत आहेत, असे बिहार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख सचिव प्रत्यय अमृत यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले की, डोर-टू-डोर आरोग्य तपासणी सुरूच राहील आणि वैद्यकीय सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे लेव्हल १ आणि २ हॉस्पिटलपर्यंत समान राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.