आता तरी पक्ष सोडण्याचा विचार नाही ; खडसे

0

नागपूरः भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल नागपुरात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. खडसे आता भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा विषय नाही, असं म्हणत खडसेंनी भाजपा सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका. कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही, आज तरी मी कोणाचीही भेट घेतलेली नाही. या साऱ्या अफवा आहेत. मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त नागपूरला आलो असल्याचे खडसे यांनी सांगितले.

खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. पक्षासाठी इतका संघर्ष करूनही माझ्यावर अन्याय झाला, अशी भावना खडसेंनी वारंवार बोलून दाखविली आहे. त्यांनी अनेकवेळा पक्ष सोडण्याचा इशारा देखील दिला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेकदा एकनाथ खडसे पक्ष सोडणार अशी चर्चा सुरु होती. पण खडसेंनी या अफवा असल्याचं म्हटलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.