आणखी एका एसटी कर्मचाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  

आणखी एका एसटी  कर्मचाऱ्याने जीवन संपवले. हा कर्मचारी ब्रम्हपुरी एसटी आगारात वाहतूक नियंत्रक असून ही घटना आज उघडकीस आली. सत्यजित ठाकूर असे त्याचे नाव आहे. ब्रह्मपुरी शहरातील राहत्या रूमवर विष प्राशन करून त्याने आत्महत्या केली. गेले 3 दिवस कुणालाही तो भेटला नव्हता. आज अचानक शेजा-यांनी दार ठोठावल्यावर प्रतिसाद मिळाला नसल्याने दार तोडले असता घटना समोर आली. संप आणि राज्य सेवेत विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अत्यल्प वेतानामुळे कर्मचारी त्रस्त आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. परंतु आत्महत्येच्या या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत, शेवटी जगायचं तरी कस? या प्रश्नामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

आत्महत्या केलेला कर्मचारी सत्यजित ठाकूर यांचे वय ३४ वर्ष होते. त्यांना आणि चार महिन्यांची मुलगी देखील आहे. त्यांची पत्नी नागपूरला  राहते. दोनच दिवसांपूर्वी ते ब्रह्मपुरीला आले होते पण त्यांचा फोन स्वीच ऑफ लागल्यानंतर पत्नीला शंका आली. त्यानंतर पत्नीने त्यांच्या सहकाऱ्यांना कॉल केले. तेव्हा घरी जाऊन पाहिले असता हा प्रकार समोर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here