धानोरा, ता.चोपडा प्रतिनीधी: अडावद पोलीस स्टेशन येथे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पोलीस स्टेशन मध्ये आणून कोरोना टेस्ट करून घेतली. यात गावात ते ऐकून 72 जण रिकामचोट फिरत असताना सापडले. असताना त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यामध्ये 70 जण निगेटिव्ह तर 2 जण पॉझिटिव्ह सापडले.
यात स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांची मदत झाली. याशिवाय डॉ विजय देशमुख, डॉ दिनकर वाघ , डॉ प्रकाश पारधी यांनी सहकार्य केले तर आडावद येथिल पी एस आय किरण दाडंगे,व पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांनी अतिमहत्वाच्या कामाव्यतिरिक्त कोणीही बाहेर फिरू नये असे आवाहन केले आहे.