Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»आठवडाभरात सोने 800 रुपयांनी महागले, चांदीही महागली ; पहा आजचा नवा दर
    महाराष्ट्र

    आठवडाभरात सोने 800 रुपयांनी महागले, चांदीही महागली ; पहा आजचा नवा दर

    By April 17, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : देशभरात दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा दोन लाखांवर गेला आहे. त्याचे पडसाद कमॉडिटी बाजारावर उमटत आहेत. आठवडाभरात सोने आठशे रुपयांनी महागले आहे. सोने आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

    या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याचा भाव ४६५०० रुपयांच्या आसपास होता तर चांदी ६६३०० रुपये होती. आठवडाभरात सोने आणि चांदीमध्ये उलथापालथ दिसून आली.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव ४७३५० रुपयांवर बंद झाला. त्यात १७५ रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४७४३२ रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव ६८६०२ रुपयांवर बंद झाला असून त्यात ६२ रुपयांची वाढ झाली.

    Goodreturns या वेबसाईटनुसार आज शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५००० रुपये आहे तर २४ कॅरेटचा भाव ४६००० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२६० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०४१० रुपये आहे. त्यात ११० रुपयांची वाढ झाली. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४५२० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८५६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९००० रुपये आहे.

    जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेने सोने दरात घसरण होत आहे. चालू वर्षात सोने जवळपास ३५०० रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र गेल्या दोन आठवड्यात देशात करोनाचा कहर सुरु आहे. दैनंदिन रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा अनिश्चित परिस्थितीत दीर्घकालावधीत जोखीममुक्त गुंतवणूक म्हणून सोने एक चांगला पर्याय असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. २०२० मध्ये करोना संकटात सोन्याने २८ टक्के परतावा दिला. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६३०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला होता. तर २०१९ मध्ये सोन्यामधून गुंतवणूकदारांना २५ टक्के परतावा मिळालं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif