पारोळा प्रतिनिधी शहरातील आझाद चौकामध्ये फार जुन्या काळातील मुतारी आहे. जवळपास वीस ते पंचवीस वर्ष जुनी मुतारी आहे. ह्या मुतारी चा वापर करण्यासाठी जवळपास एक ते दीड किलोमीटर वरून नागरिक येत असतात एवढ्या मोठ्या परिसरामध्ये दुसरी एकही मुतारी नसल्यामुळे या परिसरातील लोक येथे येत असतात. मडक्या मारुती चौक मोठा महादेव चौक शिवाजी विभाग शेवडी गल्ली दिल्ली दरवाजा बडा मोहल्ला हत्ती गल्ली तेली भवन लाडशाखीय वाणी मंगल कार्यालय परिसरातील लोक या ठिकाणी रात्री-बेरात्री मुतारी साठी येत असतात.
ही मुतारीची भिंत खालून पूर्णपणे पोखरली गेली असून मुतारी शेवटची घटका मोजत असताना मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी ही मुतारी त्वरित नगरपालिका प्रशासनाने जमीनदोस्त करून नवीन बांधकाम करण्यात यावे. तसे न झाल्यास सर्व परिसरातील नागरिक नगरपालिकेवर मोर्चा काढतील असे आझाद चौकातील ज्येष्ठ तरुण नागरिकांकडून बोलले जात आहे. व मुतारी च्या आजुबाजूला सुट्टीच्या दिवशी लहान मुलं बॅट बॉल व व इतर खेळ खेळत असतात व मुतारीच्या बाजूने झपाट भवानी चौकाकडे येणार्या जाणार्यांचे मोठी वर्दळ असते. त्या मुतारीच्या मोठा अपघात झाल्यास नगर पालिका प्रशासन जबाबदार राहील असे नागरिकांकडून बोलले जात आहे.