मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. सलग १८ व्या दिवशी इंधन दर स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
देशभरातील अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन महागाईत इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. खरंतर, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग १८ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?
महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.63 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.33 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 89.25 रुपये इतका आहे.
दरम्यान, जळगावातही पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर गेले आहे. जळगावात पेट्रोल – ९८.६१ प्रतिलिटर रुपये आहे. तर डिझेल – ८८.२५ प्रतिलिटर रुपये आहे. सततच्या वाढणाऱ्या पेट्रोलच्या दरामुळे प्रवासाी वाहतुक करणाऱ्या रिक्षांचे भाडे देखील वाढले आहे. जळगाव शहरात कोठेही जायचे असल्यास एका प्रवाशाकडून साधारण १२ ते १५ रूपये भाडे घेतले जात होते.
आज मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर कायम आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८८.६० रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९१.१७ रुपये आहे. डिझेलचा भाव ८१.४७ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९३.१७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.४५ रुपये भाव आहे.
आज कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९१.३५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.३५ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.२२ रुपये असून डिझेल ८६.३७ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.७६ रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर ९९.२१ रुपयांवर स्थिर आहे.