मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमती सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत 0.13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 0.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,700 रुपये इतकी झाली होती. तर चांदी 0.60 टक्क्यांनी वधारली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमतीत वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यात भारतातील 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 5 हजार रुपयांनी वधारले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचा दर 56,200 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
सोने-चांदीची नवी किंमत
गुरुवारी, MCX वर सोन्याचा भाव 66 रुपयांच्या उच्चांकासह 49,220 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत 1,907.67 डॉलर प्रति औंसच्या जवळपास पाच महिन्यांच्या उच्चांक पातळीवर पोहोचला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने हे पाच महिन्याच्या उच्च स्तरावर 1,916.40 डॉलर प्रति औंस इतकी झाली आहे.
अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात मऊपणामुळे सोन्याला आधार मिळाला आहे. अमेरिकेच्या 10 वर्षांच्या ट्रेझरीचे उत्पादन 1.60 टक्क्यांपेक्षा खाली गेले आहे. यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे.
तर चांदीची किंमत 102 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर प्रतिकिलो 72,780 रुपये इतका झाला आहे. गेल्या सत्रात चांदीची किंमत ही 0.6 टक्क्यांनी वाढला होता.