आज पुन्हा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती ; जाणून घ्या आजचा भाव

0

नवी दिल्ली: नवी दिल्लीः पेट्रोल-डिझेलच्या किमती आजही पुन्हा वाढल्या आहेत. या महिन्यात सलग 21 दिवस पेट्रोल अन् डिझेलच्या इंधन दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर काल रविवारी त्याच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नव्हती. पण आज पुन्हा दोन्ही इंधनाचे दर वाढले आहेत. डिझेल 13 पैशांनी महागले असून, पेट्रोलची किंमतही 5 पैशांनी वाढली आहे. त्यामुळे तुम्हाला एका लिटर पेट्रोलसाठी आता 80.43 रुपये द्यावे लागणार आहेत. तर, एक लिटर डिझेलची किंमत 80.53 रुपये असणार आहे. खरंतर, रविवारी तेलाच्या किंमतीत सतत होणारी वाढ थांबली होती. पण पुन्हा किंमती वाढल्या आहेत.

जाणून घ्या या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर
दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि 80.53 रुपये लिटर आहे.
मुंबई- पेट्रोलचे दर 87.19 रुपये आणि डिझल 78.83 रुपये लिटर आहे.
कोलकाता- पेट्रोल 82.10 रुपये आणि डिझल 75.64 रुपये लिटर.
चेन्नई- पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझलचे दर 77.72 रुपये लिटर आहे.

या महिन्यात डिझेलची किंमत 11.23 रुपयांनी वाढली आहे, तर पेट्रोलची किंमत 9.17 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या महिन्याच्या कच्च्या तेलाचे दर घसरले, तरीही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत चालल्या आहेत. सध्या भारतीय बास्केट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 42 डॉलर इतकी आहे. तरीसुद्धा या महिन्यात जवळपास पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढतच राहिले आहेत. याचाच परिणाम म्हणजे गेल्या 23 दिवसांत डिझेलच्या दरात प्रतिलिटर 11.23 रुपयांची वाढ झाली आहे. या दिवसांत पेट्रोलच्या दरातही प्रतिलिटर 9.17 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.