आजाराला कंटाळून तरुणाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यातील भालोद येथील ३१ वर्षीय तरूणाने दुर्धर आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना  आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

रविंद्र प्रभाकर जावळे (वय ३१, रा. भालोद ता. यावल) असे तरूणाचे नाव आहे. रविंद्र जावळे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शौचास जातो असे सांगून तो घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत त्याचा शोधाशोध केली पंरतू आढळून आला नाही. दरम्यान भालोद-बामणोद रोडवर एकविरा देवीच्या मंदीराजवळ असलेल्या अशोक चौधरी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापुर्वी रविंद्र जावळे याने विहिरीजवळ अंगावरील कपडे व चप्पल विहिरीच्या काठाजवळ ठेवली होती. शुक्रवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी गावातील काही नागरीकांना अंगावरील कपडे आणि चप्पल आढळून आल्याने हा आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. मयत रविंद याला दुर्धर आजार जाडला होता. या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांना सांगितले.

यावल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह विहिरीतून काढून यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक किरण चाटे करीत आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here