आजपासून वाजणार IPLचं बिगुल

0

दुबई : क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या IPLमध्ये अनेक व्रिकम झाले आहेत. मागील 12 वर्षांच्या IPLच्या कारकिर्दीत असंख्य अनपेक्षित असे विक्रम नोंदवले गेले आहेत. यंदा कोरोनाच्या संकटात भारताबाहेर IPL आयोजित करण्यात आले आहे. आज सायंकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) यांच्यात शेख जैयाद क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे.

षटकारांची आतषबाजी, शेवटच्या षटकापर्यंत अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत जाणारा प्रत्येक सामना आणि वाढत जाणारी उत्सुकता यामुळे आयपीएलची अनेक दिवसांपासून सर्वांनाच उत्सुकता होती. शिवाय बऱ्याच अंतराने खेळाडूही मैदानावर उतरण्यास उत्सुक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.