मुंबई – महाराष्ट्र राज्य सरकारने काल संध्याकाळी उशिरा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आजपासून महाराष्ट्र राज्यात सरळ-सरळ प्रवेश मिळणार नाही प्रवेश कसा मिळेल याबाबतचे राज्य सरकारने धोरण जाहीर केले असून या बाबतची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना दिली
गृहमंत्री देशमुख यांनी प्रसारमाध्यमां जवळ महाराष्ट्र राज्यातील प्रवेशाबाबत स्पष्ट करताना सांगितले की, दिवाळी झाल्यानंतर भारतातील सर्व राज्यांमध्ये कोरोनाच्या प्रमाणामध्ये वाढ दिसत आहे. महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचे प्रमाण वाढताना दिसत आहे आणि हे प्रमाण पुढील काळात अजून वाढू नये यासाठी महाराष्ट्र राज्याने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाद्वारे दिल्ली असो, राजस्थान असो, गोवा असो, की गुजरात असो किंवा कोणतेही राज्यांमधून प्रवासी येत असतील ते रेल्वे मार्गाने येत असतील विमाना द्वारे येत असतील अथवा रस्त्याने येत असतील, त्यांना महाराष्ट्रात यायच्या पहिले 25 तारखेपासून आर टी पी सी आर टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट त्यांना दाखविल्याशिवाय कोणालाही महाराष्ट्र मध्ये प्रवेश करता येणार नाही.