आजपासून जिल्ह्यात काय होणार सुरू काय राहणार बंद प्रवेश कुठे आणि किती जणांना सविस्तर वाचा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

0

जळगाव जिल्ह्यात आजपासून दुकाने रात्री नऊ पर्यंत सुरु राहणार

रविवार बंदचे निर्बंध हटवले

लग्नसमारंभासाठी फक्त पन्नास जणांना तर अंत्यविधीसाठी फक्त वीस जणांना अनुमति

जिल्हाधिकारी राऊत यांनी रात्री उशिरा काढले आदेश

जिल्हाधिकार्‍यांनी काढलेला आदेश जसाचा तसा वाचा लोकशाहीवर

-: आदेश:
को दंड प्र-01/कावि/2020/ 5।9
दिनांक 14 ऑक्टोबर, 2020
ज्याअर्थी, उपोद्घात नमूद सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 14 मार्च, 2020 अन्वये करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खड 2.3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.
आणि ज्याअर्थी, उपोद्घात नमूद या कार्यालयाकडील आदेश दिनांक 01 ऑक्टोबर, 2020 अन्वये जळगाव जिल्हयाकरीता लॉकडाऊन कालावधी 31 ऑक्टोबर, 2020 पावेतो वाढविण्यात आलेला असून शासनाकडील आदेश दिनांक 30 सप्टेंबर, 2020 मध्ये नमूद बाबी जळगाव जिल्हयाकरीता लागू करण्यात आलेल्या आहेतःआणि ज्याअर्थी, उपोद्घात नमूद शासन आदेश दिनांक 14 ऑक्टोबर, 2020 मध्ये नमूद केल्यानुसार
लॉकडाऊन कालावधीत लागू करण्यात आलेले निबंध शिथील करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याअर्थी, मी. अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगांव आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन या कार्यालयाकडील आदेश दिनांक 01 ऑक्टोंबर, 2020 मध्ये नमूद केलेल्या बाबी कायम ठेवण्यात येत असून उपोद्घातात नमूद शासनाकडील आदेश दिनांक 14 ऑक्टोबर, 2020 मध्ये नमूद तरतुदींच्या अधिन राहून खालील प्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे.
A) जळगांव जिल्हयात कोव्हिड-19 च्या अनुषंगाने व्यवस्थापन करण्याबाबत खालील प्रमाणे राष्ट्रीय निर्देश लागू राहतील..
1) मास्कचा वापर करणे – जळगाव जिल्हयातील सर्व नागरिक / व्यक्ती यांनी सार्वजनिक ठिकाणी कामाचे ठिकाणी व प्रवास करताना चेह-यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. Social Distancing चे पालन करणे – जळगांव जिल्हयातील सर्व नागरिक/व्यक्ती यांनी सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी 6 फुट (2 गज की दुरी) शारिरीक अंतर ठेवणे आवश्यक राहील. दुकान चालक /मालकयांनी ग्राहकांना सेवा देण्यासाठी Social Distancing चे पालन करुन एका वेळी 05 पेक्षा जास्त ग्राहकाना प्रवेश देण्यात येऊ नये.
in) समूहाने एकत्र जमणे – मोठया प्रमाणावर गर्दी होणारे कार्यक्रम / सभा बंदच राहतील. लग्नसमारंभाकरीता जास्तीत जास्त 50 लोकांना व अत्यविधीकरीता जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित राहता येईल. v) सार्वजनिक ठिकाणी धुंकण्यास बंदी राहील,
v) सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखु व दारु इत्यादीचे सेवन करण्यास बंदी राहील वर नमद बाबींचे उल्लंघन करणा-या कोणत्याही व्यक्ती / नागरिक/ आस्थापना / घटक यांचेवर या कार्यालयाचे उपोद्घातात नमुद आदेश दिनांक 31 जुलै, 2020 अन्वये स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक
कारवाई करण्यात येईल.
vi) Work From Home – कामाच्या ठिकाणी / व्यवसायाच्या ठिकाणी, दुकाने, मार्केट, ओद्योगिक
आस्थापना व वाणिज्य आस्थापनाच्या ठिकाणी धरून काम करण्यावर भर देण्यात यावा. vi) स्क्रिनींग व वैयक्तिक स्वच्छता राखणे-कामाच्या ठिकाणी प्रवेश व निर्गमन करतांना थर्मल स्क्रिनीग
करणे, हात धुणे. सॅनिटाईजरचा वापर करणे इत्यादी बंधनकारक राहील.
i) निर्जंतुकीकरण करणे – कामाच्या ठिकाणी, एकत्रित सुविधा देण्याच्या ठिकाणी, नागरिक / व्यक्तींच्या
संपर्कात येणारे सर्व ठिकाणे उदा. दरवाज्यांचे हँडल्स, शिफ्ट बदलताना संपूर्ण ठिकाणी निर्जतुकीकरण करणे अनिवार्य राहील.
ix) Social Distancing – कामाच्या ठिकाणी सर्व कामगार / मजूरांनी दोन शिफ्ट मधीन अंतराच्या वेळी,
जेवताना, Social Distancing चे पालन करणे अनिवार्य राहील,
B) प्रतिबंधित (Containment Zone) क्षेत्र :
॥ शासन आदेश दिनांक 19 मई, 2020 व दिनांक 21 मे, 2020 मध्ये नमूद केल्यानुसार प्रतिबंधित (Containment Zone) क्षेत्र घोषित करण्याबाबतचे नियम पुढील आदेश होईपावेतो लागू राहतील. निर्गमत केलेल्या
2) प्रतिबंधित क्षेत्राचे सिमांकन व निबंध हे केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाकडून वेळवेळी आदेशानुसार पुढील आदेश होई पावेतो लागू राहतील
C) लॉकडाऊन कालावधीत जळगांव जिल्हयात घोषित करण्यात आलेले व भविष्य घोषित करण्यात येणारे प्रतिबंधित (Containment Zone) क्षेत्र वगळता खालील बाबी लाग राहतील, 1) आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवा बद राहतील (भारत सरकार यांनी परवानगो दिलेले हवाई वाहतूक सेवा वगळून) 2) सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक / प्रशिक्षण / कोचिंग संस्था दिनांक 31 ऑक्टोबर, 2020 पर्यंत बद राहतील. तथापि आनलाईन / दूरस्थ शिक्षण प्रक्रिया सुरु राहतील.
3) दिनांक 15 ऑक्टोंबर, 2020 पासून सर्व शाळामधील 50% शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ऑनलाईन शिक्षण / टेली काऊन्सिलींग व शाळेतील इतर कामकाज करण्यासाठी शाळेत उपस्थित राहण्यासाठी मुभा राहील. तथापि याबाबतची नियमावली (SOP) शालेय शिक्षण विभागाकडून स्वतंत्रित्या निर्णमित करण्यात येईल.
4) दिनांक 15 ऑक्टोबर, 2020 पासून कोशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण केंद्र सुरु राहतील. उदा. National skill Training Institutes, Industrial Training Institutes (ITIS), short term training centres registerd with National skill Development corporation or State skill Development Missions or other Ministries of Government of India Or Government of Maharashtra. दिनांक 15 ऑक्टोबर, 2020 पासून National Institutes for Entrepreneurship and SmallBusiness Development (NIESBUD). Indian Institutes of Entrepreneurship (IE) and theirtraining providers देखील सुरु राहतील, 5) उच्च शैक्षणिक संस्था ऑनलाईन / दुरस्थ शिक्षण प्रक्रिया teaching करीता सुरु राहतील. तथापि उच्च शैक्षणिक संस्था केवळ research scholars (Ph.D) a post graduates students in science and technology stream requiring laboratory / experimental कामकाजासाठी दिनांक 15 ऑक्टॉबर, 2020 पासून सुरु
राहतील.
अ) केंद्र शासन अनुदानीत उच्च शैक्षणिक संस्थेतील प्रमुखांनी research scholars (Ph.D) व post graduates students in science and technology streamrequiring laboratory / experimental T e करणे अत्यंत आवश्यक असल्याबाबत व्यक्तीशः खात्री करावी,
आ)इतर उच्च शैक्षणिक संस्था उदा. राज्यातील विद्यापीठ, खाजगी विद्यापीठ येथील केवळ research scholars (Ph.D) 7 post graduates students in science and technology streamrequiring laboratory/ experimental या कामासाठी सुरु ठेवण्यात यावे. तथापि याबाबतची नियमावली (SOP) उच्च शिक्षण विभाग यांच्याकडे स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल.
6) सर्व शासकीय व खाजगी ग्रंथालये हे सोशल डिस्टन्सींग चे पालन करुन व सॅनिटाईनींग करुन दिनांक 15 ऑक्टोंबर, 2020 पासून सुरु राहतील. तथापि कोव्हिड 19 विषाणू संदर्भातील शासनाकडील मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच याबाबतची नियमावली (SOP) उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचेकडून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल.
7)बगीचे, पार्क व सार्वजनिक मोकळया जागेतील ठिकाणे मनोरंजनासाठी सुरु ठेवता येतील. 8) दिनांक 15 ऑक्टोबर, 2020 पासून व्यवसाय ते व्यवसायाकरीता प्रदर्शन हे प्रतिबंधित (Containment Zone) क्षेत्र वगळून सुरु करता येतील. तथापि याबाबतची नियमावली (SOP) औद्योगिक विभाग यांचेकडून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल.
9) दिनांक 15 ऑक्टोबर, 2020 पासून आठवडे बाजार (गुरांचे बाजार सह) हे प्रतिबंधित (Containment Zone) क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात सुरु राहतील. तथापि याबाबतची नियमावली (SOP) महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित ग्रामपंचायत यांनी कोव्हिड-19 विषाणू संदर्भातील शासनाकडील मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन तयार करावी. 10) दिनांक 15 ऑक्टोंबर, 2020 पासून प्रतिबंधित (Containment Zone) क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील
मार्केट्स / दुकाने हे गर्दी कमी करणे / नियंत्रित करण्याच्या उद्देशाने सकाळी 09.00 ते रात्री 09.00वाजेपर्यंत सुरु राहतील.तसेच जळगांव शहरातील मार्केट कॉम्प्लेक्स साठी लागू असलेली शनिवार,
रविवार बंदचे निर्देश शिथिल करणेत येत आहेत. 11) संबंधित विमानतळ प्राधिकरणाने विमानतळावर आगमन करणा-या स्थानिक प्रवाशांची कोव्हिड-19 सदृष्य
लक्षणांबाबत तपासणी करावी व indelible ink च्या सहाय्याने stamping करण्यात यावे
D) कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (SOPs) नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील. सदरचा आदेश उपोद्घातात नमूद संदर्भ क्र. 22 महाराष्ट्र शासन आदेश दिनांक 14 ऑक्टोबर 2020 सोबत वाचावे.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदरचा आदेश हा आज दिनांका 4/10/2020 रोजी माझ्या सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला असे.
सही/-(अभिजीत राऊत)जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगांव

Leave A Reply

Your email address will not be published.