जळगाव :- ग्रामसेवक युनियनतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. पाटील यांना निवेदन देण्यात आले. युनियनचे जिल्हा सचिव संजय भारंबे, अशाेक खैरनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. पंतप्रधान किसान सन्मान याेजनेचे काम पालक अधिकारी म्हणून ग्रामसेवक युनियनने नाकारले अाहे. शासन निर्णयाशी विसंगत काम करण्यासाठी ग्रामसेवकावर दबाव टाकून शिवराळ भाषेचा वापर केल्यामुळे संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केल्याचे निवेदनात नमूद केले अाहे. या याेजनेचे गुरुवारपासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला अाहे.
पंतप्रधान किसान सन्मान याेजनेचे पाडळसे (ता.यावल) येथे काम करण्यास तळेले यांना सांगण्यात अाले हाेते. तेथे काहीच काम झालेले नाही. त्याबाबत प्रांत अधिकारी डाॅ.अजित थाेरबाेले यांनी त्यांना विचारणा केली. मात्र, त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांसाेबत बाेलताना अर्वाच्य भाषा वापरली. त्यांनी पीएम किसानचे काहीच काम केलेे नाही.