नवी दिल्ली : तेल कंपन्यांनीकडून डिझेलच्या किंमतीत प्रति लीटर 10 पैशांनी घसरण झाली. मात्र पेट्रोलच्या किंमतीत कोणताच बदल केला नाही. याआधी गुरुवारी डिझेलच्या किंमतीत 15 पैसे प्रति लीटर घट पाहायला मिळाली होती. दिल्लीमध्ये शुक्रवारी पेट्रोल 72.90 रुपये किंमतीवर स्थिर राहीले. तर डिझेल 10 पैशांनी कमी होऊन 66.24 प्रति लीटर स्तरावर पोहोचले.
अर्थसंकल्पात सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्युटी लावल्यामुळे पेट्रोल 2.45 रुपये आणि डिझेल 2.36 रुपये प्रति लीटरने महागले होते. दुसरीकडे क्रूड ऑईलच्या किंमतीही थोड्या प्रमाणात वाढल्या. शुक्रवारी क्रूड ऑईलच्या किंमतीत हलकी वाढ झाल्याने ते 60.51 प्रति बॅरलच्या स्तरावर पोहोचले. तर ब्रेंट क्रूड ऑईल 66.83 प्रति बॅरल स्तरावर राहीले.